चौफेर न्यूज – महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता होती. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यानुसार राज्याचा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in, https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
कोविड मुळे बारावीची परीक्षा यंदा घेता आली नाही. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल तयार करण्यात आलाय. दुपारी चार वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. महापुरामुळे निकाल उशिरा जाहीर होतोय. बारावीचा एकूण निकाल 99.63 टक्के लागला आहे. विज्ञान 99.45 टक्के, वाणिज्य 99.91 टक्के, कला 99.83 टक्के लागला असून यावर्षी 2.92 टक्क्यांनी निकाल वाढलाय, अशी माहिती दिनकर पाटील यांनी दिली.
6, 542 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. 35 टक्के गुण मिळालेले 12 विद्यार्थी आहेत. 46 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. 1319754 विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी 1314965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल 99. 63 टक्के लागला आहे.
66871 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 66867 विद्यार्थी उत्तीर्ण एकूण निकाल 94.31 टक्के लागला आहे.
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा निकाल 99.34 टक्के लागला आहे.