चौफेर न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बाराावीचा निकाल दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. मागच्या वेळचा अनुभव बघता आपण पूर्ण तयारी केलेली आहे. यावेळी आम्ही पाच लिंक देत आहोत. तांत्रिक लोकांशी चर्चा करुन पूर्ण काळजी घेत आहोत. बारावीच्या निकालाच्या वेळी व्यवस्थापन करण्यास बोर्डाला सांगितलं आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना निकालासाठी शुभेच्छा देते. विद्यार्थ्यांनी भविष्यात महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.

ग्रामीण भागात शाळा सुरु केलेल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की गेल्या दीड वर्षांपासून मुलं घरी आहेत. मुलं घरी बसून वैतागली आहेत, त्यांना घराबाहेर पडावं असं वाटत आहे. पालकांचीही मागणी शाळा सुरु करण्यासंदर्भात आहे. शहरी भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे फाईल दिली आहे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. काही ठिकाणी आणि मुंबईत नियम शिथील झालेत, तिथे टप्याटप्याने शाळा सुरू करण्यात येतील.

पूरग्रस्त भागात शालेय पाठ्यपुस्तकं भिजली आहेत, पोषक आहार भिजलाय, ग्रामीण भागात काय नवं मॉडेल वापरता येईल, हा मोठा प्रश्न आहे. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न सुरू, त्यानंतर महत्वाचा निर्णय होईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या

काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावीचा चा निकाल जाहीर करण्यात आला होता. तेव्हापासूनच बारावीचा निकाल कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. आता पालक आणि विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून आज बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे यामुळे दहावी प्रमाणेच बारावीच्या निकालालाही यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा झाला आहे. आज दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.

निकाल कुठे पाहायचा?

1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in.

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here