चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल  स्कूलचे संस्थापक मा. श्री. प्रशांत भीमराव पाटील सर, प्राचार्य, व्यवस्थापक,शिक्षक व विद्यार्थी यांच्या सर्व  तर्फे आदिवासी बांधवांना व गरजूंना दिवाळी फराळाचे व कपड्यांचे वाटप शाळेच्या प्राचार्या, व्यवस्थापक व शिक्षक व विद्यार्थी यांनी  साक्री येथील एकलव्य नगर,  गोल्डी जवळी आदिवासी वस्ती येथे  करण्यात आले. दिवाळीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी आकाश कंदील, दिवे, दीपावली शुभेच्छा ग्रीटिंग कार्ड, क्राफ्ट डिझाईन ,कपडे ,दिवाळी फराळ इत्यादी गरजू विद्यार्थ्यांसाठी दिले. सौ. भारती पंजाबी मॅडम यांनी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सौ. वैशाली लाडे मॅडम आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना देवरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी व फलक लेखन करण्यात आले . सर्व शिक्षक वर्गाने व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here