चौफेर न्यूज – दिवाळी निमित्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूल तर्फे आदिवासी बांधवांना व गरजूंसाठी दिवाळी फराळ व कपड्याचे वाटप व  कार्यक्रमाचे आयोजन – दिवाळीनिमित्त प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी स्कूलमध्ये वसुबारस,धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी,लक्ष्मीपूजन,बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच वेगवेगळ्या सणांचा सणांची सजावट करून शाळेच्या प्राचार्या, व्यवस्थापक यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. वसुबारस या दिवशी गाईची पाडवा सह पूजा केली जाते. हिंदू लोक गायीला पवित्र मानतात. गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात. तिला गोमाता म्हणतात तिची उपयुक्तता ओळखूनच तिची पूजा केली जाते. अशी माहिती श्री गौतम  वाघ सरांनी  विद्यार्थ्यांना दिली. अश्विन कृ.त्रयोदशी या दिवसाला धनतेरस असेही म्हणतात. या दिवशी संध्याकाळी धनाची व आयुर्वेदिकऔषधींची पूजा केली जाते. धन्वंतरी आरोग्याची देवता असून या देवतेचे स्मरण करून पूजा करावी. त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते.अशी माहिती श्री. गोकुळ गोविंल सरांनी विशद केली. नरक चतुर्दशी ला.सर्व लोक पहाटे उठून सुवासिक तेल उटणे लावून गरम पाण्याने स्नान करतात.घरात सगळीकडे दिवे लावतात.घर प्रकाशाने उजळून टाकतात  अशी माहिती गौतम वाघ यांनी विशद केली. आश्विन वद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मीपूजन,श्री लक्ष्मीचे स्वागत होते या दिवशी बळीच्या बंदिवासातून लक्ष्मीची सुटका झाली. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. तिचे वास्तव्य आपल्या घरात कायमचे रहावे यासाठी सर्वजण तिची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात अशी माहिती श्री.जयेश  शर्मा सर यांनी दिली. बलिप्रतिपदेला व्यापारी पाडवा म्हणतात. व्यापारी याच दिवशी जमाखर्चाच्या वह्यांची पूजा करतात असे नितीन सर यांनी सांगितले. भाऊ बहिणीच्या प्रेमाचा दिवस म्हणजे भाऊबीज बहीण भावाला ओवाळते व भाऊ बहिणीला अलंकार किंवा पैसे देतो अशी माहिती वैष्णवी थोरात मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली. प्रचिती इंटरनॅशनल  स्कूलचे संस्थापक मा. श्री. प्रशांत भीमराव पाटील सर, प्राचार्य, व्यवस्थापक,शिक्षक व विद्यार्थी यांच्या सर्व  तर्फे आदिवासी बांधवांना व गरजूंना दिवाळी फराळाचे व कपड्यांचे वाटप शाळेच्या प्राचार्या, व्यवस्थापक व शिक्षक व विद्यार्थी यांनी  साक्री येथील एकलव्य नगर,  गोल्डी जवळी आदिवासी वस्ती येथे  करण्यात आले. दिवाळीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी आकाश कंदील, दिवे, दीपावली शुभेच्छा ग्रीटिंग कार्ड, क्राफ्ट डिझाईन ,कपडे ,दिवाळी फराळ इत्यादी गरजू विद्यार्थ्यांसाठी दिले. सौ. भारती पंजाबी मॅडम यांनी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सौ. वैशाली लाडे मॅडम आणि प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करा असा संदेश दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना देवरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी व फलक लेखन करण्यात आले . सर्व शिक्षक वर्गाने व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here