चौफेर न्यूज – आज दिनांक1 नोव्हेंबर2021रोजी प्रचिती पब्लिक स्कूल येथेदिवाळी सणसाजराकरण्यात आला. कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात आली. दीपावलीच्या शुभ परवा निमित्त पाचही दिवसांची मांडणी करण्यात आली. दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता. दीपावलीचादुसरा दिवस म्हणजेधनत्रयोदशी -धनवर्षाव अखंडित होआणि आरोग्यमयजीवन लाभो. दीपावलीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन – लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा. दीपावलीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज –  जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे भावा-बहिणीची साथ अतूट राहू दे. दीपावलीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा- सत्याचाअसत्यावर नेहमीच प्रभाव असावा .अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ सर्वाना लाभो. माननीय श्री.प्रशांत भीमराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम साजरी करण्यात आला. शाळेचे समन्वयक श्री. राहुल पाटील सर यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन करण्यात आले व् गरजूंना फराळ वाटप करण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here