चौफेर न्यूज – आज दिनांक ११/०४ / २०२२ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी श्री.राहुल पाटील सर उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. प्रतिमा पूजनाच्या वेळी शारदस्तवण शिक्षीका सरिता अहिरे मॅडम यांनी गायले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महात्मा जोतिबा फुले यांच्या विषयी विविध प्रश्न विचारण्यात आले. विद्यार्थ्यांनी योग्य उत्तरे देऊन कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. शाळेच्या प्राचार्य अनिता पाटील मॅडम यांनी विद्येविना मती गेली मतिविना निती गेली नीतिविना गती गेली गतिविना वित्त गेले वित्त्विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले! हा महात्मा जोतिराव फुले यांच्या संदेश विशेष पद्धतीने वर्णिला. तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी अधिक माहिती शिक्षिका सरिता अहिरे मॅडम यांनी सगितली. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.