चौफेर न्यूज – प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनंर येथे दि. 1 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र दिन हा कामगार दिन म्हणून देखली साजरा करण्यात येतो. 1 मे 1960 रोजी मोरारजी देसाई यांनी संयुक्त राष्ट्राची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला पण तेथील कामगार लोकांनी त्या नवीन राष्ट्राच्या निर्मीतीला उधळून लावले. त्यासाठी आंदोलनाला बसलेले 161 कामगाराचा बळी गेला त्यादिवसापासून महाराष्ट्र हे स्वतंत्र्य राज्य म्हणून घोषीत करण्यात आले.
जगतो जगासाठी आयुष्यभर,
मायमातीचा आधार
नाही कुणाचा लाचार
माझ्या भुमितला कामगार
अशा या महान दिनी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शाळेचे समन्वयक व उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानीत श्री.राहूल अहिरे सरांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापीका अनिता पाटील मॅम तसेच शिक्षिका अर्चना देसले, सरिता खैरनार, किरण देवरे, अनूष्का धामणे, सुनिता जाधव, रिनल सोनवणे व पल्लवी अहिरे उपस््थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरिता खैरनार यांनी केले. तसेच कार्यक्रमाची सांगता अर्चना देसले यांनी केली. महाराष्ट्र दिनाची अधिक माहिती अनुष्का धामणे यांनी दिली. आणि सर्व शिक्षीकांनी महाराष्ट्र दिनाचे गीत सादर केले.