आज दि. 21/06/2022 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला.
स्वयं को बदलो तो यह जग बदलेगा
योग से सुखमय हर दिन निकलेगा
आजच्या या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर मुख्याध्यापीका अनिता पाटील मॅम उपस््थित होत्या.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुंदर असे रांगोळी रेखाटण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनुष्का धामणे मॅम यांनी केले. आंरराष्ट्रीय योगा दिन विषयी माहिती सरिता अहिरे यांनी दिली. योगा दिना विषयी माहिती शाळेतील विद्यार्थ्यांनी विभुती सोनवणे हिने दिली.
शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आसने करून दाखविली. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्याव्दारे विविध आसने प्रदर्शित केली. त्यामुळे सर्व विद्यार्थी मानसीक तनाव मुक्त होऊन आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसुन आला. तसेच योगा मुळे शरीर तुदुरूस्त राहण्यात मदत करते व जीवन निरोगी राहण्यास मदत करते.
शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर यांनी योगा दिनाविषयी माहिती सांगीतली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली गेली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.