चौफेर न्यूज – संविधानामध्ये 18 वर्षे वयोगटातील व्यक्तींना मतदान करण्याचा अधिकार आहे . परंतु प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये संस्थेचे संस्थापक श्री .प्रशांत भीमराव पाटील सरांनी व शालेय व्यवस्थापनाने इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मतदानाची संधी उपलब्ध करून दिली .श्री. प्रशांत भीमराव पाटील सरांनी इयत्ता नववीतील विद्यार्थी 1) ब्ल्यू गटातील – कुमारी समीक्षा वाणी, कुमार मंदार देवरे 2) रेड गटातील – कुमारी कृष्णा अकलाडे, कुमार कुशल अहिरराव 3) ग्रीन गटातील – कुमारी यशिका भामरे, कुमार खुशाल पाटील 4)एलो गटातील – कुमारी स्वराली राणे, कुमार सम्यक कांकरिया या मुख्य प्रतिनिधींना मतदानाच्या शुभेच्छा दिल्या. शालेय विकास घडविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेऊन, त्या समस्या शालेय व्यवस्थापना विभागाकडे मांडाव्यात व त्यांचे निरसन केले जावे. या दृष्टिकोनातून मुख्य प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडवण्याचे वचन दिले व त्यांना शालेय शिस्त, अनुशासन, वर्ग नियंत्रण, शालेय जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडण्याचे वचन दिले. प्रत्येक वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना तसे आश्वासन दिले. प्रत्येक हाऊस मधील विद्यार्थ्याने व विद्यार्थिनींनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडवू असे आश्वासन दिले . यासाठी मुख्य प्रतिनिधींचे फोटो नावासहित वोटिंग बूथ मध्ये लावण्यात आले व कम्प्युटरच्या साह्याने इलेक्ट्रिक वोटिंग मतदान करण्यात आले . प्रत्येक विद्यार्थ्यास वोटिंग करण्याच्या आधी (निळ्या रंगाची शाही) मतदान केल्याचे निशाण लावण्यात आले .इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत उत्साहात सहभाग नोंदवला .तसेच मुख्याध्यापिका, व्यवस्थापक, शिक्षक वर्ग , कर्मचारी वर्ग, वाहन चालकवर्गाने देखील मतदान प्रक्रियेत उत्साहाने सहभाग नोंदवला.