चौफेर न्यूज – प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
गुरूशिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय आत्मा नाही
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म
सर्वकाही गुरूंचीच देन आहे
माझ्या सर्व गुरूंना खुप खुप धन्यवाद आणि गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
आजच्या या कार्यक्रमात शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर आणि मुख्याध्यापिका आनिता पाटील मॅम उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. गुरू पौर्णिमा विषयी माहिती अनुष्का मॅम यांनी दिली व गुरू पौर्णिमा निमित्त सुंदर असे गीत सुनिता जाधव मॅम यांनी गायले. गुरू पौर्णिमा विषयी माहिती शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थांनी सांगितली.
शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर यांनी गुरू पौर्णिमा विषयी माहिती सांगितली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली गेली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.