चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये 5 फेब्रुवारी 2023 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेचे संस्थापक श्री.प्रशांत भीमराव पाटील सर, सौ. कविता प्रशांत पाटील शाळेच्या प्राचार्या सौ.भारती पंजाबी मॅम, सौ. वैशाली लाडे मॅम, व्यवस्थापक श्री. तुषार देवरे सर, श्री. वैभव सोनवणे सर, श्री. राहुल अहिरे सर,प्रमुख अतिथी सौ. अश्विनी गांगुर्डे मॅम (प्रतापपूर) सौ चारुशीला अहिरे मॅम (उंबरे)सौ. पुष्पा ठाकरे मॅम (नवडणे)सौ. प्रणिता अहिरे (दिघावे) सौ.शोभा पवार मॅम (साक्री) सौ. सविता पाटील मॅम (साक्री )सौ. लीना पाटील मॅम
(भोनगाव) सौ. सोनाली खैरनार मॅम (साक्री) सौ. विजया पाटील मॅम (निजामपूर) ज्योती देवरे मॅम (म्हसदी) सौ. रूपाली टाटिया मॅम (साक्री) यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व नृत्याचे देवता नटराज यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख अतिथींचा सत्कार शाल, श्रीफळ व फुलांचा गुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी सौ. शोभा गिरीधर पवार मॅडम प्रचिती इंटरनॅशनल स्कूल विषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की मी सायली पवार इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीची आई या नात्याने आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला मला अतिथी म्हणून बोलविले म्हणून प्रथमतः मी सर्वांचे आभार मानते प्रचिती बद्दल बोलायचे म्हटले तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडून आणणारी विद्यार्थ्यांचा बौद्धिकच नाही तर शारीरिक मानसिक भावनिक सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष देणारी शाळा आहे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबत विविध स्पर्धा आयोजित केल्या जात असतात त्यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेबद्दल आवड निर्माण होते माझी पाल्य नर्सरीच्या वर्गापासून या शाळेत शिकत आहे म्हणून मी प्री प्रायमरी च्या वर्गापासून तिचा अभ्यासाचा पाया पक्का करून घेतलेला आहे म्हणूनच तिची निवड नवोदय मध्ये निवड झालेली होती आम्ही तिला तेथे शिकवण्यासाठी पाठवले परंतु माझ्या मुलीला आपल्या शाळेतील शिकविणे तिथल्या शाळेपेक्षा अधिक योग्य वाटले म्हणून आम्ही पुन्हा सहा महिन्यात आपल्या शाळेत प्रवेश घेतला प्रचिती शाळा सर्वच गोष्टींमध्ये अव्वल आहे असे मनोगत व्यक्त केले.या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी चौथी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या कार्यक्रमा साठी जुनाआणि नवीन बदल आणि संवर्धन यावर आधारित श्री गणेश वंदना गाणे या रे या सारे या (इयत्ता सहावी बी) स्वर्ग से करेंगे सबका वेलकम सॉंग (सातवी) ट्रिब्यूट टू लता मंगेशकर जारे हट नटखट (इयत्ता चौथी बी) स्कूल थीम वर आधारित टन टन चलो घंटी बजी (पाचवी ए) फनी डान्स (इयत्ता आठवी) बचना ये हसीनो बॉलीवूड सॉंग (इयत्ता नववी) कोरोना थीम वर आधारित हाय रब्बा हाय रब्बा (चौथी ए) फेस्टिवल थीम वर आधारित (पाचवी ब) ट्रिब्यूट टू शाहरुख खान (इयत्ता सहावी अ) एलिगल वेपन (आठवी ए) फनी डान्स (इयत्ता नववी) जोगवा गोंधळ खानदेशी गाणं (इयत्ता सातवी) स्वच्छ भारत अभियान (इयत्ता पाचवी ए ) मंगळागौर मराठी रिमिक्स (इयत्ता चौथी बी ) बॉलीवूड रिमिक्स (आठवी बी) ट्रिब्यूट टू शिवाजी महाराज (इयत्ता सहावी बी) रामजी की चाल देखो (इयत्ता नववी) राधाकृष्ण थीम (चौथी बी) फनी डान्स (इयत्ता सहावी ए) हाय झुमका वाली (आठवी ए) भारतीय संविधान थीम (पाचवी ए) ओल्ड टू न्यू थीम (इयत्ता चौथी बी) लावणी (इयत्ता आठवी बी) वुमन एम्पॉवर थीम (इयत्ता सहावी बी) ह्यूमन पिरॅमिड
(इयत्ता चौथी ते नववी) स्वीट हार्ट डान्स (चौथी बी) स्केटिंग डान्स (चौथी ते नववी) आपलीच हवा (सातवी ) नाचो नाचो (आठवी ए) बॉलीवूड रिमिक्स घुंगरू टूट गये (नववी) या नृत्याचे प्रदर्शन केले. या नृत्यासाठी सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी वर्षभर शाळेत होणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा (पीपीटी प्रेझेंटेशन)श्री. मनोज वाघ सर व कोमल मॅम यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व रांगोळी रेखाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन श्री. कुणाल देवरे सर व सौ. स्मिता नेरकर मॅम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता नेरकर मॅम व सौ . मनिषा बोरसे मॅम यांनी केले.