सलंग्न निधीसाठी स्थायी समितीत 55 लाखाला मंजुरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे सुरु करण्यात येणारे वैद्यकीय महाविद्यालयासाठी कागदोपत्री नोंदणीचे कामकाज सुरू झाले आहे. भविष्यात येथे सुरू करण्यात येणाऱ्या दहा शाखांचे नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी (एमयुएचएस) संलग्णीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 55 लाखांचा निधी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये मंजूर करण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी हिरानंद आसवानी होते. यावेळी सभेच्या विषयपत्रीकेवर वायसीएम येथे सुरू होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांअतर्गत 10 शाखांचे एमयुएचएसशी सलंग्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शाखा 5 लाख 50 हजार एवढा शुल्क आकारण्यात आला आहे. त्यानुसार 55 लाखाचे शुल्क द्यावे लागणार आहेत.
याविषयी माहिती देताना आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय म्हणाले की, सध्या महाविद्यालयाची नोंदणी प्रक्रीया सुरू आहे. त्याचा पहिला प्रवेश 2018 च्या जूनमध्ये होईल. त्यासाठी आवश्यक असलणा-या 10 शाखांचे आपण सलंग्नीकरण करत आहोत. ज्यामध्ये मेडिसीन, सर्जरी, रेडीओलॉजी, इएनटी, पॅथॉलॉजी, सायकॅट्रीक, अॅनेस्थेशीया, गायनॅकॉलॉजी, ऑर्थोपेडीक, पिडीअॅट्रीअॅशन या दहा शाखा चालू करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या नाकारलेला प्रस्ताव डॉ. श्रीकर परदेशी यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा चालना मिळत असून केंद्र सरकारने महापालिकेला पुन्हा पाठविण्यास सांगितले आहे. महाविद्यालय सुरू झाल्यास महापालिकेला स्थायी स्वरुपात सुमारे 90 डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.
वायसीएम रुग्णालरामध्ये डॉक्टरांचा तुटवडा असतो ही समस्या जाणून श्रीकर परदेशी यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त असतानाच वायसीएमला संलग्न वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, वैद्यकीय शाखेचे पदविका अभ्यासक्रम नसताना अपवादात्मक परिस्थितीत पदव्यूत्तर अभ्यासक्रमाच्या परवानगीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाने नामंजूर केला होता. याच विषयावर तोडगा काढत त्यांनी पुन्हा नुकताच दिल्लीतील केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या एका बैठकीत डॉ. परदेशी यांनी वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता असल्याने तेथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे जेणे करुन तेथील विद्यार्थी वायसीएम रुग्णालयातच पुढील प्रशिक्षण घेतील. ज्याचा वायसीएम रुगणालयालयाच फायदा होईल.