चौफेर न्यूज – आज दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी ग्रॅज्युएशन डे प्रचिती पब्लिक स्कुल पिंपळनेर येथे साजरा करण्यात आला. शाळेचे समन्वयक श्री. राहूल अहिरे सर व मुख्याध्यापिका श्रीमती सौ. अनिता पाटील मॅम व प्रमुख अतिथी रुपाली सोनवणे व कविता ढिंगरे मॅम यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ. अनिता मॅम व सौ. सुनिता मॅम यांनी केला.
सिनियर के जी च्या वर्गात विद्यार्थी पाच वर्षाचे असतात. या वयाच्या विद्यार्थ्यांना खोळण्याची आवड असते परंतु खेळाबरोबर अभ्यासदेखील तितकाच महत्त्वाचा असतो. सिनियर के ची च्या विद्यार्थ्यांनी नर्सरी ते सिनियर के जी पर्यंत आपले शिक्षण पूर्ण केले याबद्दल त्यांना गौरवण्यात आले. पूर्व प्राथमिक शिक्षणा मधून प्राथमिक शिक्षणात प्रवेश केल्यामुळे त्यांना पदवीप्रदान करून गौरविण्यात आले. प्रतिक्षा कोतकर मॅम यांनी सूत्रसंचालन केले. सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्य सादर केले. नृत्यदिग्दर्शन अनुष्का धामणे मॅम व काजल राजपूत मॅम यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रभारी सुनिता जाधव मॅम यांनी केले. सुंदर असे रांगोळी रेघाटन किरण देवरे मॅम व आश्विनी मॅम यांनी केले. सुंदर असे फलकलेखन सौ हेतल मॅम व रिनल सोनवणे मॅम यांनी केले.
उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत नेहमी नवी दिशा असावी, घरट्यात काय
केव्हाही बांधता येईल, क्षितित्यापलीकडे झेप
घेण्याची मनात जिद्द असावी.
अशा प्रकार’ ‘मॅज्यूएशन डे’ आनंदाने साजरा करण्यात आला. व कार्यक्रमाची सांगता निरोप समारंभ आश्विनी पगार मॅम यांनी केली.