चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाव क्रमांक 17 मध्ये सत्तारूढ पक्षनेते श्री. नामदेवराव ढाके यांच्यावतीने आज बुधवार दि. 1 एप्रिल रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किराणा दुकान, रेशन दुकान, मेडिकल तसेच प्रभागातील अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या दुकानांसमोर सोशल डिस्टिंगशनचे चौकोणी पट्टे मारण्यात आले. यावेळी, अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या पुरवठादारांना तसेच रेशन दुकानदार यांना शिधा पत्रिकाधारक व नागरिकांना धान्य वितरित करण्याच्या सुचना केल्या.