चौफेर न्यूज – कोराणा विषाणूच्या संसंर्गामुळे शाळा तसेच कोचिंग क्लासेस सध्या बंद आहेत. खासगी कोचिंग क्लासेसवर अवलंबून असणाऱया राज्यातील 15 लाख कर्मचाऱयांना बेरोजगारीपासून वाचविण्यासाठी सध्या ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्या, अशी मागणी राज्य खासगी कोचिंग क्लासेस मालक संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.
राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून खासगी कोचिंग क्लासेस बंद आहेत. क्लास मालकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे, असे संघटनेचे अध्यक्ष सचिन कर्नाकट यांनी सांगितले. तसेच खासगी कोचिंग क्लासेसकडून कमी जीएसटी कर आकारण्याची मागणीदेखील त्यांनी केली.
राज्यात जवळपास 98 हजार कोचिंग क्लासेस आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सर्व कोचिंग क्लासेस बंद झाले तेक्हापासून आतापर्यंत आम्हाला काही कर्मचाऱयांना पगार द्यावे लागत असून मोठे नुकसान सहन करावे लागत आहे, असेही कर्नाकट म्हणाले.
दरवर्षी एप्रिल ते जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी क्लासेसमध्ये प्रवेश घेतात; मात्र कोरोनामुळे यंदा एकही प्रवेश झाले नाही. अशा परिस्थितीत कोचिंग क्लासेस मालकांना कर्मचाऱयांचे पगार द्यावे लागत आहेत. आम्ही सुरक्षेची सर्व काळजी घेऊन क्लासेस सुरू करण्यास तयार आहोत, मात्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळत नाही. राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील क्लासेस आम्हाला सुरू करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा क्लास चालक-मालक यांचे जगणे कठीण होईल, असेही कर्नाकट यांनी स्पष्ट केले