चौफेर न्यूज – प्रचिती पब्लिक स्कुल, पिंपळनेर येथे 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आजच्या परिस्थितीनुसार कोरोना विषाणूमुळे आजचा कार्यक्रम शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आजचा कार्यक्रमासाठी शाळेचे समन्वयक श्री. राहुल महेंद्र पाटील सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच त्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रूपेश कासार सर यांनी केले. ध्वजस्तंभाजवळ रांगोळी ज्याेती खैरनार मॅडम यांनी काढली तसेच कार्यक्रमासाठी शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सौ.अनिता पाटील मॅडम, सौ.अर्चना देसले मॅडम, सौ.ज्योती खैरनार मॅडम, रूपेश सर, विसपूते सर, गणेश सर, कोठावदे मावशी, खैरनार मावशी इ. उपस्थित होते. सदर कार्यक्रमात स्वच्छ भारत, निमित्त भारत, आत्मनिर्भर भारत, अशी घोषणा देऊन देशाप्रती मानवंदना करण्यात आली. अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न करण्यात आला.