चौफेर न्यूज – उंभरे ता.साक्री जि.धुळे येथे  वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले यात कापणीसाठी आलेले पिकांची नुकसान झाली कांदा मका व इतर पिकांचे फार नुकसान झाले आधी कोरोनामुळे शेतकरी हतबल झाला असतांना  हातातोंडाशी आलेला घास या अस्मानी संकटामुळे भुईसपाट झाला प्रचंड वाऱ्या मुळे मका व इतर पिकांना जमीनदोस्त केले यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले तसेच कांदा लागवडीसाठी कांदा बियाणे टाकले असताना तेसुद्धा फार खराब झाले तरी या सर्व संकटामुळे शेतकरी फार अडचणी सापडला आहे.

 तसेच या वादळी वाऱ्या मुळे उंभरे जिल्हा परिषद शाळेतील मोठी झाडे पडल्यामुळे शाळेचे नुकसान झाले तसेच वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे उंभरे गावाच्या प्रवेशद्वार जवळील मोठे पिंपळाचे झाड पडले सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here