चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री येथे होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या श्रीमती. भारती पंजाबी मॅडम श्रीमती. वैशाली लाडे मॅडम तसेच शाळेचे व्यवस्थापक श्री.वैभव सोनवणे सर श्री. राहुल अहिरे सर व श्री. तुषार देवरे सर यांची उपस्थिती लाभली. होळी या सणाबद्दल माहिती तसेच प्रत्येक राज्यामध्ये होळी हा सण कसा साजरा केला जातो? याबद्दलची माहिती शाळेतील शिक्षक श्री. मोहन गावित सर यांनी दिली.वाईट विचारांचे, वाईट वृत्तींचे दहन करण्यासाठी होलिका दहन केले जाते. म्हणून कोरोना यासारख्या वाईट विषाणूपासून संपूर्ण जगाचे संरक्षण व्हावे. अशी संकल्पना व्यक्त करत शाळेचे व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर यांच्या हस्ते होलिका दहन करण्यात आले.