चौफेर न्यूज – गेल्या वर्षांपासून कोरोना संकटामुळे (Corona crisis) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता आजही तशीच स्थिती आहे. मात्र शैक्षणिक संस्थांनी शुल्क आकारणी सुरूच ठेवली आहे. ऑनलाइनने शिक्षण (online Education) सुरु असून कोरोनामुळे आर्थिक स्थितीही कोलमडली आहे. त्यामुळे शुल्ककपात करण्याची मागणी पालकांनी केली होती. शाळा सुरूच नाही तर जादाचे शुल्क का भरायचे अशी भूमिका पालकांनी घेतली त्या पार्श्वभूमीवर मेस्टा संघटनेकडून (mesta) २५ टक्के शुल्ककपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या तब्ब्ल १८ हजार शाळेतील विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एवढेच नाही तर कोरोनामुळे पालक गमवलेल्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
शुल्क न भरल्यामुळे शाळा चालवणे अवघड झाले असून सर्वोच्च न्यायालयाने १५ टक्के फी करण्याचं सूचित केले होते. त्यामुळे मेस्टाने हा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार राज्यातल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी अखेर २५ टक्के शुल्ककपात केली.
या निर्णयाचा लाभ राज्यातल्या १८ हजार शाळांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.