चौफेर न्यूज – जगभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकांच्या सुरक्षिततेसाठी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आल्याने अनेक उद्योगधंदे,आर्थिक कामकाज ठप्प झाले. याचा शैक्षणिक क्षेत्रालाही मोठा फटका बसला होता. तसेच विद्यार्थांसाठी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय राबवण्यात आला होता. सध्या कोरोनाची लाट हळू-हळू ओसरत आहे. आटोक्यात आलेली रुग्णसंख्या तसेच राज्यभरात राबवण्यात आलेली लसीकरण मोहीम यामुळे पुन्हा एकदा ऑफ लाइन शिक्षणास सुरुवात करण्यासाठी चाचपणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रातील लातूरमध्ये बारावीचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येत विद्यार्थी दाखल होतात. इतकंच नाही तर लातूर शहराचे मुख्य अर्थकरण यावर अवलंबून असल्याचे आढळून आले आहे.
लातूर मधील राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थांच्या पालकांनी ऑफ लाईन नीट सराव परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी लातुरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. पालकांची मागणी लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थांना ऑफलाईन सराव परीक्षा देण्यास मान्यता दिली असून मात्र पुढील अटी विद्यार्थांसमोर घालण्यात आल्या आहेत. व त्याचे पालन करने विद्यार्थांना अनिवार्य असणार आहे.
- NEET परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थांनी ऑफलाईन सराव परीक्षा देतांना covid19 प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे.
- आरोग्य विभाग,लातूर शहर महानगरपालिका यांच्यामार्फत ओयोजीत सर्व शिक्षकांनी तसेच कर्मचारी,विद्यार्थांनी 100% लसीकरण करणे बंधनकारक आहे.
- सोशल डिस्टंसिंगचे पालन करत बैठक व्यवस्था करण्यात यावी.
- शिक्षक,कर्मचारी,विद्यार्थांना फेस मास्कचा वापर अनिवार्य करण्यात यावे.
- परीक्षा केंद्राचे व्यस्थितपणे सॅनीटायझेनशन करावे. तसेच कोव्हिड किट प्रत्येक परिक्षा केंद्रात असने बंधनकारक आहे.
- फक्त NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांनाच ऑफलाईन सराव परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- परीक्षा केंद्रात शारीरिक अंतराचे पालन करत फक्त 50 टक्के आसन क्षमात एका वर्गात असने बंधनकारक आहे
- तसेच एक बॅच संपल्यानंतर दुसऱ्या बॅच मधील कलावधीत 30 मिनिंटाचे अंतर ठेवण्यात यावे. यादरम्यान संपुर्ण वर्ग स्वच्छ तसेच निर्जंतुकीकरण करण्यात यावे
- पालकांची संमती असणाऱ्या विद्यार्थांना क्लासमध्ये बसण्याची परवनगी दिली जावी.
- तसेच कोणालाही परिक्षा केंद्रात कोव्हिडची लक्षणे दिसल्यास त्याला वर्गात प्रवेश देऊ नये.
- सदर आदेश फक्त या वर्षी नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांसाठी लागू करण्यात आला आहे. या व्यतिरीक्त इतर केणत्या वर्गासाठी लागू राहणार नाही
- या आदेशाअंतर्गत नीट ऑफलाईन सराव परीक्षेसाठी देण्यात आलेली परवानगीची वैधता नीट 2021 परीक्षा संपेपर्यत असणार आहे.
- या नियम अटींचे उल्लंघन केल्यास सदर आदेश रद्द करण्यात येईल तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियमामधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.