चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये रक्षाबंधनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका नीतू पंजाबी मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना रक्षा बंधन हे भावा बहिणीच्या प्रेमाचे अतूट बंधन आहे. बहिण भावाच्या हाताला राखी बांधते. म्हणजे त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते. तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेतो. तुटलेली नाती जोडावीत,जोडलेली नाती अधिक दृढ व्हावी हे सांगणारा हा सण आहे असे नमूद केले. शाळेच्या शिक्षिका सौ सुनिता पाटील मॅडम यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व विशद करताना सांगितले की रक्षाबंधन हे भाऊ बहिणीच्या प्रेम,आपुलकी व विश्वासाचे प्रतीक आहे.याप्रसंगी साक्री पोलीस स्टेशन येथे शाळेच्या शिक्षिका सपना देवरे मॅम नववी व दहावी तील विद्यार्थिनींनी कोरांना काळात सर्वांची वेळोवेळी मदत करून समाजाचे रक्षण करणारे माननीय श्री.दिनेश आहेर सर व त्यांचे सहकारी तसेच शासकीय दवाखान्यातील आरोग्याची काळ्जी घेणाऱ्या व कोरोना योद्धाना म्हणजेच डॉक्टर अहिरराव व त्यांच्या सहकारी डॉक्टर यांना विद्यार्थिनींनी राखी बांधली व त्यांचे आभार मानले. तसेच शाळेत इयत्ता आठवी, नववी, दहावी च्या विद्यार्थिनींनी सर्व मुलांना राख्या बांधल्या व मुलांनी सर्व मुलींना भेटवस्तू दिल्या. तसेच सर्व शिक्षिकांनी सर्व शिक्षकांना देखील राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या.सौ.भारती पंजाबी मॅम प्रचिती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ.वैशाली लांडे मॅम व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर श्री. तुषार देवरे सर एक दिवसीय उपप्राचार्य श्री. नितीन राजपूत सर, शिक्षक वृंद व इतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.