चौफेर न्यूज – जेईई अॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेची प्रवेशपत्रे आयआयटी खरगपूरने रविवारी आपल्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहेत. या परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांची प्रवेशपत्रे या वेबसाईटवर जाऊन डाऊनलोड करू शकणार आहेत. जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी देशातील विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे. देशातील आयआयटी संस्थांमधील इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेला प्रत्येकी तीन तासांचे दोन पेपर आहेत. दोन्ही पेपर देणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे.