चौफेर न्यूज – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनं 12 वीच्या विशेष परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विशेष मूल्यांकन सूत्रानुसार जाहीर करण्यात आलेल्या निकालावर समाधानी नसलेल्या, खासगी आणि श्रेणी सुधारणा करण्यासाठी बोर्डाने घेतलेल्या ऑफलाइन विशेष परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in. Cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.
30 सप्टेंबरपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाईन
12 वीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरपूर्वी निकाल जाहीर करण्याची शक्यता होती. सीबीएसईनं आजचं बारावीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएसई बोर्डाने सुप्रीम कोर्टात बारावीच्या कंपार्टमेंट आणि विशेष परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत जाहीर करणार असल्याचं सांगितलं होतं.
CBSE 12th Compartment Result 2021 मार्कशीट कसं डाऊनलोड करायचं?
स्टेप 1: सीबीएसईची वेबसाईट cbseresults.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2: लेटेस्ट अपडेट सेक्शन वर क्लिक करा तिथे रिझल्ट लिंक वर क्लिक करा.
स्टेप 3: आता डाऊनलोड रिझल्ट लिंक पर क्लिक करा.
स्टेप 4: लॉगिन पेजवर रोल नंबर आणि जन्मतारीख नोंदवा.
स्टेप 5: यानंतर निकाल उपलब्ध होईल, तो डाऊनलोड करा.
CBSE 12 वी निकाल पाहण्याचे आणखी पर्याय
CBSE 12 वी निकाल पाहण्यासाठी अनेक आहेत. यामध्ये डिजीलॉकर, SMS, ई मेल, उमंग मोबाईल अॅप, आयव्हीआरएस याद्वारे निकाल पाहू शकता.
Digi locker
डिजीलॉकर एक ऑनलाईन क्लाऊड सॉफ्टवेअर आहे. यामध्ये आपण निकाल चेक करुन मार्कशीटही डाऊनलोड करु शकता. त्यासाठी तुम्हाला डिजीलॉकर वेबसाईटवर जाऊन ‘View result’ वर क्लिक करा. तिथे तुमचा रोल नंबर टाका, क्लास निवडा आणि अॅडमिट कार्ड टाका. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. विद्यार्थ्यांना निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढता येऊ शकेल.
SMS आणि IVRS
विद्यार्थी SMS नेही आपला निकाल पाहू शकतात. मोबाईलवरुन spacespace हा तपशील भरुन 7738299899 या नंबरवर SMS करा. निकाल जाहीर झाल्यानंतर यावर निकाल मिळू शकेल. याशिवाय IVRS द्वारेही निकाल ऐकायला मिळू शकतो. त्यासाठी 011-24300699 नंबरवर कॉल करा.