चौफेर न्यूज – एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रम शाळा ISO मानांकन करण्याचा उपक्रमाचा संकल्प व मानस धुळे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी केला होता त्या नुसार अनुदानित आश्रम शाळा आमळी तालुका साक्री या आश्रम शाळेने नुकतेच ISO मानांकन प्राप्त केले त्या मुळे आज धुळे प्रकल्पातिल शासकीय आश्रम शाळा अनुदानित आश्रम शाळा शासकीय वसतिगृह ISO मानांकन करण्याचा शुभारंभ धुळे उपविभागीय कार्यालयात प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या शुभ हस्ते नुकतेच ISO प्रमाणपत्र प्राप्त अनुदानित आश्रम शाळा आमळी चे अध्यक्ष डी के माळी मुख्याध्यापक युवराज जाधव विजय जाधव साळवे सर चौधरी सर माळी सर या आमळी टीम च्या प्रतिनिधी न ना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या वेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी विजय भडगावकर पी के ठाकरे भटू आव्हाड धुळे प्रकल्पाचे अधिकारी सह विजय खैरनार सर हजर होते या प्रसंगी आमळी आश्रम शाळेचे अध्यक्ष मुख्याध्यापक सह सर्व कर्मचारी यांचे प्रकल्प अधिकारी तृप्ती धोड मिसे मॅडम यांनी कौतुक व अभिनंदन केले व जास्तीत जास्त धुळे प्रकल्पातिल आश्रम शाळा व वसतिगृहा चे मुख्याध्यापक वॉर्डन व शिक्षक सह सर्व कर्मचारी यांनी ISO मानांकन चे निकष पूर्ण करून मानांकन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी भविष्यात कामकाज करण्याचे आप आपल्या स्तरांवर नियोजन करावे असे आव्हान धुळे प्रकल्पात तिल आश्रम शाळा व वसतिगृह टीम यांना केले व त्या साठी वेळो वेळी प्रकल्प कार्यालय धुळे मार्पत मार्गदर्शन केले जाईल असे ही त्यांनी या प्रसंगी सांगितले यावेळी छोटे खाणी कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार विजय खैरनार यांनी मानले.