चौफेर न्यूज – नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. यूजीसीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यापासून ४ वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठीचे हे नियम देशातील सर्व विद्यापीठांसाठी लागू केले जातील. यूजीसीने 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी सर्व आवश्यक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये यूजी अभ्यासक्रमांसाठी नवीन नियम केले जाणार आहेत. चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांची (FYUP) रूपरेषा तयार आहे. येत्या शैक्षणिक सत्र 2023-24 पासून, सर्व विद्यापीठांचे नवीन विद्यार्थी 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये (BA, B.Com, B.Sc.) इ. प्रवेश घेऊ शकतील.
नवीन विद्यार्थ्यांना 4 वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांचा पर्याय
२०२३-२४ पासून सर्व नवीन विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांचा पर्याय असेल. ४ वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाची योजना जुन्या विद्यार्थ्यांसाठीही मंजूर केली जाऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी सामान्य तीन वर्षांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे त्यांना पुढील सत्रापासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
3 वर्षांचा अभ्यासक्रमही सुरू राहणार
सर्व विद्यार्थ्यांसाठी ४ वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल. असे असले तरीही या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची सक्ती विद्यार्थ्यांना केली जाणार नाही. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास ते आधीपासून सुरू असलेले ३ वर्षांचे पदवीपूर्व अभ्यासक्रम सुरू ठेवू शकतात.