चौफेर न्यूज – प्रचिती स्कूल ही विद्यार्थ्यांना पायाने नाही तर डोक्याने चालायला शिकवते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे प्रचितीचे आद्य कर्तव्य आहे. तालुकास्तरीय पावसाळी शालेय स्पर्धांमध्ये प्रचितीच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यात 14 वर्षाआतील जिल्हास्तरीय स्पर्धेत रोशन सुनील पाटील याची विभाग स्तरावर निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री प्रशांत भीमराव पाटील सर यांनी त्याचे हार्दिक अभिनंदन केले आहे .तसेच शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी मॅम वैशाली लाडे, वैभव सोनवणे, तुषार देवरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.