चौफेर न्यूज – पिंपरी, 5 डिसेंबर – बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पिंपरी, चिंचवड आणि मावळचे पदाधिकारी येत्या (बुधवारी) जाहीर केले जाणार आहे. उपनेते, खासदार श्रीरंग बारणे पदाधिका-यांची घोषणा आणि मार्गदर्शन करणार आहेत.
चिंचवड येथील अॅटो क्लस्टर सभागृहात बुधवारी (दि.7) सकाळी साडे अकरा वाजता हा मेळावा होणार आहे. आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मैदानात बाळासाहेबांची शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. त्या दृष्टीने पक्षाचे काम सुरु आहे. पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या जात आहे. पक्ष संघटन वाढविण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे गेल्यानंतर शहरातील अनेक पदाधिकारी त्यांच्यासोबत गेले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांची शिवसेनेचा पहिला पदाधिकारी मेळावा होत आहे. मावळ, पिंपरी आणि चिंचवडमधील पदाधिकारी घोषित केले जाणार आहेत. खासदार बारणे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार बारणे पदाधिका-यांना मार्गदर्शन करणार आहेत.