पिंपरी :- आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळ संचलित श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरचा “वार्षिक क्रीडा महोत्सव” कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे संस्थापक गोविंदरावजी दाभाडे सर, सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. माळे सर तसेच सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. रमेश गायकवाड सर आणि सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर माजी विद्यार्थिनी कु. समीक्षा सुभाष पाटील (राष्ट्रीय खेळाडू नेमबाज) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
“आयुष्यात येणारी आव्हाने पेलण्यासाठी तसेच शरीर तंदुरुस्त, सुदृढ व बळकट राहण्यासाठी खेळाचे आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. खेळ आयुष्यात आपल्या अंगी शिस्त निर्माण करतात”, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक गोविंदरावजी दाभाडे सर यांनी केले.
तसेच माजी विद्यार्थिनी कु. समीक्षा सुभाष पाटील तसेच सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री.गायकवाड सर यांनी आपले मनोगत मांडले. त्यात अभ्यासाबरोबर खेळालाही महत्त्व दिले पाहिजे, याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रकाश कोळप, सूदत्त जाधव, विकास आंधळे, अमोल गुंड, मंगेश अहिरे, योगेश पाटील, अविनाश आखाडे आदी क्रीडा शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. विद्या रेडकर मॅडम, निवेदन सौ. भारती भोंगाडे मॅडम व शिक्षक मनोगत सौ. सुहासिनी वैद्य मॅडम व आभार सौ. मनीषा चिंचवडे मॅडम यांनी केले.