महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता मिळाला. अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता तर अपूर्वा नेमळेकरने उपविजेती ठरली आहे. बिग बॉस मराठीचा १०० दिवसांचा प्रवास रविवारी संपला. या बिग बॉसच्या घरात १९ सदस्य एका ट्रॉफीसाठी लढले. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. पण महविजेता एकच असणार आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
बिग बॉस मराठीhttps://www.instagram.com/p/CnKaqKIriFn/?utm_source=ig_embed&ig_rid=5b080560-8b42-4ea8-ba3a-3d2a259c8cf6
च्या या सीझनमध्ये सदस्य १०० दिवस अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहात होता, महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता मिळाला. अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता तर अपूर्वा नेमळेकरने उपविजेती ठरली आहे. विजेत्या अक्षय केळकरला १५ लाख ५५ हजार इतकी रक्कम, ट्रॉफी आणि पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे १० लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर देण्यात आले.
अक्षय केळकरची पहिली प्रतिक्रिया
खिलाडूवृत्ती, टास्कमधली मेहनत, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहेमीच चर्चेत राहिला. बिग बॉस मराठीच्या या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी त्याला मिळाली आणि आता तो या पर्वाचा विजेता ठरला. विजेतेपद पटकावल्यानंतर अक्षय म्हणाला की, आज फक्त प्रेक्षकांमुळे मी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरलोय. मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची माझी इच्छा पूर्ण झाली. मी माझे लक्ष्यदेखील पूर्ण केले.