पिंपरी – आळंदी येथील श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदीरामध्ये साधकह्दय वै. गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा यांचा दहावा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आहे.या सोहळ्या मध्ये अखंड हरिनाम सप्ताह,दिव्य ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचा प्रारंभ 15 जानेवारी रोजी झाला असून या सोहळ्याची सांगता 22 जानेवारी रोजी शांतिब्रम्ह मारोती कुऱ्हेकर यांच्या सकाळी 9 ते 11च्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.15 जानेवारी ते 21 जानेवारी रोजी रोज संध्याकाळी साडे सहा ते साडे आठ या वेळेत कीर्तन सेवांचे आयोजन करण्यात आले आहे.
या पुण्यस्मरण सोहळ्यात दि.15 रोजी ह भ प विठ्ठल महाराज कापसे व दि.16 रोजी ह भ प विष्णू महाराज केंद्रे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.दि.17 रोजी महंत प्रमोद महाराज जगताप, दि.18 रोजी ह भ प भास्कर महाराज पवार,दि.19 रोजी आसाराम महाराज बडे,दि.20 रोजी ह भ प प्रवीण महाराज गोसावी,दि.21 रोजी ह भ प अशोक महाराज जाधव यांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.याबाबतची माहिती ह भ प विष्णू महाराज केंद्रे यांनी दिली.