पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कचरा वाहतूक व्यवस्थेबाबत आज सकाळी पाहणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ह प्रभाग कार्यक्षेत्रातील भागाची अधिका-यांसमवेत पाहणी केली.
कचरा हस्तांतरण केंद्र, कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्या, कचरा विलगीकरण व्यवस्थापन तसेच त्यासाठी ओला कचरा प्रक्रिया करणाऱ्या काही गृहनिर्माण संस्थांना देखील अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी भेटी दिल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त रविकिरण घोडके, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, सहाय्यक आरोग्याधिकारी उपस्थित होते.
आरोग्य विभागामार्फत शहरात विविध ठिकाणांची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती रविकिरण घोडके यांनी दिली.