पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय, राष्ट्रीय समाज पक्ष व शिवसंग्राम युतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा आज (दि. ६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, आमदार उमा खापरे, शंकर जगताप आदी उपस्थित होते.