पिंपरी : श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवात सामुदायिक सुर्यनमस्कार घेण्यात आले. यामध्ये चापेकर शिक्षण संस्थेच्या गुरुकुलम् शाळेचे विद्यार्थी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून योगा प्रशिक्षिका मिनल देव, सूर्यनमस्कार प्रचारक रामकृष्ण पालमकर उपस्थित होते.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने श्रीमान् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव सुरु आहे. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
योगा शिक्षिका मनाली देव आणि सूर्यनमस्काराचे प्रचारक रामकृष्ण पालमकर यांनी उपस्थितांना सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके करुन दाखविले. त्यानंतर मैदानात उपस्थित विद्यार्थी आणि नागरिकांनी सामुदायिक सूर्यनमस्कार केले. या उपक्रमात चापेकर शिक्षण संस्थेच्या गुरुकुलम् शाळेचे विद्यार्थी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.



















