शासकीय माध्यमिक आश्रम शाळा राईनपाडा तालुका साक्री येथील विद्यार्थीनि गीता शांताराम राऊत हीला आश्रमिय क्रीडा स्पर्धां – जिल्हा विभाग व राज्य स्तरिय या स्तरांवर लांब उडी खेळ प्रकरात सुवर्णपदक प्राप्त करून प्रथम क्रमांकाचे प्राविण्य प्राप्त….
चौफेर न्यूज – शासकीय माध्यमिक आश्रम शाळा राईनपाडा तालुका साक्री येथील 17 वर्ष वयोगटातील खेळाडू विद्यार्थीनि गीता शांताराम राऊत ने आश्रमिय क्रीडा स्पर्धां मध्ये शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये झालेल्या बिट तालुका प्रकल्प जिल्हा विभाग व राज्य स्तरिय या सर्व स्तरांवर लांब उडी खेळ प्रकरात सुवर्णपदक प्राप्त करून प्रथम क्रमांकाचे प्राविण्य कामगिरी प्राप्त केल्याने, या गीताच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीची दखल जागतिक महिला दीनाच्या निमित्ताने धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागा धुळे ने नुकतीच दखल घेतली . गीता शांताराम राऊत चा धुळे जि प च्या सभागृहात प्रमाणपत्र व सन्मान चषक देऊन धुळे जि. प. चे अध्यक्ष अश्विनी पवार महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदिया धुळे, जि प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेशवरी , भा प्र से उप मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतराव भदाने आदी न शुभ हस्ते सत्कार व सन्मान गीता राऊतचा नुकताच धुळे येथे करण्यात आला. गीता राऊत ला बिट ते राज्य स्तरांवर लांब उडीत सुवर्णपदक प्रथम प्राविण्य प्राप्त करण्यासाठी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा धिकारी तृप्ती धोडमिसे भा प्र से धुळे यांच्या सह मुख्याध्यापक सुभाष जाधव, प्रकल्प क्रीडा समनवयक विजय खैरनार, मनोज निकम, बालाजी उडतेवार, चंद्रकांत साळुंखे, सोनी सूर्यवंशी, ज्योती अहिरे, पनालाल पाटील , महाळू गांगुर्डे, विजय मारनर अनिल राऊत, कैलास बागुल, बनका बहिरम, पूजा देशमुख, महेश झुकले , अशोक कुवर आदी शिक्षक- शिक्षिका सह पालक शांताराम राऊत यांचे मार्गदर्शन लाभले. गीता च्या या यशाचे राईन पाडा परिसरासह तिचे मूळ गाव करंजटी परिसरात कौतुक व अभिनंदना चा वर्षाव होत आहे.