चौफेर न्यूज – पुणे दि. १0 मार्च 2023 शुक्रवार
श्रध्देय पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन “उडान” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून अॅड. शोभा कदम, श्री. निवृत्ती पिंगळे सर, संचालक प्रशांत पाटील सर यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन, सरस्वती पूजन, नटराजाच्या मूर्तीचे पूजन, शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मिळून गणेश वंदना वर नृत्य सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. नंतर प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, इयत्ता पहिली व दुसरीच्या मुलांनी विविध गाण्यावर नृत्य सादर केले, शिवजयंतीच्या दिनाचे औचित्य साधून पहिली व दुसरीच्या मुलांनी शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या पाहुण्या अँड शोभा कदम यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. सांस्कृतीक कार्यक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, तरी पालकांनी मूलांचे प्रोत्साहन वाढवावे, असे सांगितले. स्त्रियांच्या अधिकाराबद्दल त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
श्रध्देय पब्लिक स्कूलचा अॅन्युअल रिपोर्ट अल्का हाके यांनी वाचून दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिनी कुराडे, मोहिनी हुकरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केया चटर्जी यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी अल्का हाके, पूनम तांदळे, मोहिनी हुकरे, रुपाली पाटील, धनश्री घाडगे, केया, चॅटर्जी, अपूर्वा जगदाळे, रोहिनी कराडे, अंजली कुमारी, दिव्या दिक्षित, उमेश इथापे, चैताली बेंगळे, आदित्य सर, गौरव कुमार सर, सिद्धेश नाईक शिक्षकांनी आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचा शेवट वंदे मातरम या गीताने करण्यात आला. त्यानंतर उपस्थित सर्वांनी जेवनाचा आस्वाद घेतला. अशा पद्धतीने श्रद्धेय पब्लिक स्कूलचा पहिला वार्षिक स्नेहसंमेलन ‘उडान’ यशस्वीरित्या पार पडले.