चिंचवड :- चिंचवड येथील वैशाली संदेश काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ईशा नेत्रालय यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले.
याप्रसंगी माजी नगरसेविका शितल काटे, सामाजिक कार्यकर्ते संदेश काटे, अक्षय जगताप, प्रथमेश निंबाळकर, सुवर्णा बोबडे, ईशा नेत्रालयचे गणेश कांबळे, डॉ. वैभव आवताडे, डॉ. कांचन घोष, अंजली सावंत, शिवानी शिंदे, सवा सालेहा, श्रेया तळदेवकर यांच्यासह वैशाली संदेश काटे सोशल फाऊंडेशनचे सभासद व चिंचवड परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये अत्याधुनिक यंत्रांद्वारे महिलांची मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्माचे नंबरही काढून देण्यात आले. यावेळी सुमारे १०० हुन अधिक महिलांनी या मोफत नेत्र तपासणीचा लाभ घेतला.
दरम्यान, याप्रसंगी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैशाली संदेश काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने महिलांना विशेष भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनच्या वतीने महिलांना रुग्णालयात ने-आण करण्यासाठी विशेष गाडीचीही सोय करण्यात आली होती.