पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचा राष्ट्रवादीने कायापालट केला आहे. विकास कामे करताना पक्षाने कोणतीही अनियमितता केली नाही. चुकीची कामे करणाऱ्यांना पक्ष कधीही पाठिशी घालणार नाही. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडतील, अशी भिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांनी व्यक्त केली.
आझम पानसरे म्हणाले की, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. पक्षाने आजवर चुकीचे काम करणाऱ्यांना कधीही पाठिशी घातले नाही. चुकीच्या कामाला राष्ट्रवादीचा नेहमीच विरोध राहिला आहे. तसेच चुकीच्या कामे करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असो, असेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवड शहराचा राष्ट्रवादीने कायापालाट केला आहे. मात्र, पिंपरी महापालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे भाजपकडून पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. भाजपचे स्थानिक पदाधिकारी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पाडतील, अशी भिती पानसरे यांनी व्यक्त केली.
सिमा सावळे अनेक वेळेस सर्वसाधरण सभेत नगरसेवकांना शिवीगाळ करतात. सर्व साधारण सभेत नगरसेवकांनी शिवीगाळ केली नाही पाहिजे. सभागृहाचे पावित्र्य राखले पाहिजे, अशी अपेक्षाही पानसरे यांनी व्यक्त केली.