पिंपरी : भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर व दापोडी विभागतर्फे दापोडी भागातील नागरी प्रश्नांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समोर पोतराज, गोंधळी यांच्या वेशभूषेमध्ये आंदोलन केले गेले. यावेळी गोंधळाच्या माध्यमातून दापोडीच्या नागरी प्रश्नांचे मुद्दे मांडण्यात आले.
यामध्ये आरक्षित जागांचा विकास, दूषित पाणी, अनियमित पाणी पुरवठा, दूषित पाणी, ड्रेनेज व स्वच्छता, रस्ते वाहतूक कोंडी, हॉस्पिटल, क्रीडांगण, टाऊन हॉल, सांस्कृतिक भवन, गाडीतळ, स्विमिंगपूल, पीएमपीएलसाठी जागा, पार्किंग झोन व सिग्नल यंत्रणा यासारख्या समस्या मांडण्यात आल्या.
भाजपाचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस माउली थोरात, मोहन कदम, आण्णा गर्जे, पूजा वाळुंजकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल सातपुते, अमीर शेख, प्रभाग अध्यक्ष धर्मेंद्र क्षीरसागर, विकास विधाते, रामदास भांडे, दिपाली संजय कणसे, भाजरुमो अध्यक्ष रुपेश चांदेरे, हर्षद भोसले, सुशांत गायकवाड, सुधीर चव्हाण, रोहिदास धनवे, मयूर काळे, राकेश शिवशरण, रवी साठे, किशोर कांबळे, विष्णू अडागळे, यश डांगे, प्रदीप वाळुंजकर, संजय कणसे, प्रसाद आवटे आदी या वेळी उपस्थित होते.
भाजपा शहर सचिव विशाल वाळुंजकर यांनी पोतराज होऊन आसूड मारत या वेळी महापालिकेचा निषेध केला व आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे यांच्याकडे निवेदन दिले.