उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परतणार
मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून संपावर असलेल्या सरकारी कर्मचारी संघटनेने संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर युनियनने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
28 मार्चपासून संपात सहभागी होण्याचा इशारा आज राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिला होता. जुनी पेन्शन योजना लागू करण्याची या कर्मचाऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात कर्मचारी संघटनेची बैठक बोलावली होती. बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन कर्मचाऱ्यांनी संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. जुनी पेन्शन योजना लागू करू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहे. यानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या मंगळवारपासून कर्मचारी कामावर परतणार आहे.