पिंपरी :- कार्यक्षम महासंसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डीतील २२० महिलांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, शिवसेना शहर संघटीका सरिता साने, पिंपरी विधानसभा संघटिका शैलाताई निकम, शिवसेना विभागप्रमुख फारुख शेख इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अश्विनी बागुल, रेश्मा लोंढे, सिमा यादव, पुष्पा चव्हाण, रंजना सोनवणे, सावित्री कदम, वैष्णवी काळभोर, शोभा वायकर यांनी केले.
आकुर्डीत प्रमोद कुटे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा शिवसेनेत प्रवेश






















