पिंपरी :- प्रथम महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी हिचा पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. सांगली येथील महिला कुस्तीपटू पै. प्रतिक्षा बागडी हिने प्रथम महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. तिचे वडिल सांगली पोलीस दलात कार्यरत असून त्यांनी मोठ्या जिद्दीने आपल्या मुलीला घडवले, तिला पैलवान केले. प्रतिक्षाला पोलीस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, शुभम चिंचवडे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल रामदास बागडी, राजु बागडी, प्रतिक बागडी आदि उपस्थित होते.
महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी हिचा सन्मान






















