चौफेर न्यूज – आज दि. 17/04/2023 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे वार्षिक पारितोषिक समारंभ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास शाळेचे संस्थापक माननीय श्री. प्रशांत भीमराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शाळेचे समन्वयक श्री. राहुल पाटील सर, मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम उपस्थित होत्या व श्री प्रशांत देसले सर देखील उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
वार्षिक पारितोषिक समारंभ साजरा करण्याचा सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांचा विकास व्हावा व त्याला वाव मिळावा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभाग घ्यावा हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या समारंभात संपूर्ण वर्षभरात झालेल्या सर्व स्पर्धेत क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचे मेडल व प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. खेळात देखील मुलांनी सहभाग घ्यावा व तसेच त्यांचा शारिरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर विकास यासाठी वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
अशा प्रकारे विविध उद्देशांना अनुसरून वार्षिक पारितोषिक समारंभ साजरा करण्यात आला.