पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी चिंचवड संगीत अकादमी या संस्थेचे “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी, निगडी” असे नामकरण करण्यात आले. तसेच दि.१७ ते २० एप्रिल या कालावधीत आयोजित वासंतिक शिबीर २०२३ या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते आज संपन्न झाले.
या कार्यक्रमास भारतरत्न भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी, उपआयुक्त विठ्ठल जोशी, मनोज लोणकर, रविकिरण घोडके, पंडीत सुधीर नायक, क्रिडा अधिकारी अनिता केदारी, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक संगीत अकादमीचे संगीत शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीताचे ज्ञान व आवड निर्माण होण्याकरता हार्मोनियम वादन, तबला वादन, संगीतकार, तसेच शास्त्रीय गायक या विषयांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी चार दिवसांच्या वासंतिक शिबीर २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.