पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत चिंचवड मतदार संघातील विविध नागरी समस्या करिता व रखडलेले प्रकल्प प्रलंबित कामाबाबत आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बुधवार दि. २६ रोजी सर्व माजी नगरसेवकांसह आयुक्त शेखर सिंह यांच्या समवेत आढावा बैठक घेतली.

या बैठकीस चिंचवड मतदारसंघ निवडणूक प्रभारी माजी नगरसेवक शंकर जगताप, माजी सभागृह नेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, राजेंद्र गावडे, अंबरनाथ कांबळे, सुरेश भोईर, शशिकांत कदम, सागर अंगोळकर, अभिषेक बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, संदीप कस्पटे, बाबा त्रिभुवन, हर्षल ढोरे, शेखर ओव्हाळ, संतोष कांबळे, मोरेश्वर शेडगे, राजेंद्र राजापुरे, स्थायी समिती माजी अध्यक्षा ममता विनायक गायकवाड, माजी नगरसेविका संगीता भोंडवे, उषा मुंढे, सविता खुळे, सुनिता तापकीर, मनीषा पवार, नीता पाडाळे, शारदा सोनवणे, निर्मला कुटे, श्रीमती अश्विनी चिंचवडे, आरती चोंधे व मनपा अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंता व संबंधित खाते प्रमुख उपस्थित होते.
सदर बैठकीत विविध विषयांसोबत नगरसेवक, नगरसेविका यांनी आपल्या प्रभागातील रखडलेली विकास कामे व अडीअडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले.






















