पिंपरी (दि. 01 जानेवारी 2017) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून इच्छूक असणा-या उमेदवारांच्या मुलाखती नारायण मेघाजी लोखंडे सभागृह, कामगार भवन खराळवाडी पिंपरी येथे सोमवारी (दि. 02 जानेवारी) सकाळी नऊ वाजल्यापासून सुरु होणार असल्याचे प्रसिध्दी पत्रक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पक्षनिरीक्षक व माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री चंद्रकांत छाजेड, शहराध्यक्ष सचिन साठे, संग्राम तावडे, कैलास कदम, कविचंद भाट, शामला सोनवणे, निगार बारसकर, नरेंद्र बनसोडे, शहाबुद्दीन शेख, विशाल कसबे, लक्ष्मण रुपनर, अशोक मोरे, विष्णु नेवाळे आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.