भारतातील कामगार विश्वावर ज्यांचे नाव कोरले गेले त्या वर्धन साहेबांनी संपूर्ण आयुष्य कामगारांच्या भल्यासाठी , उद्धारासाठी, जीवनमान उंचावन्यासाठी,आयुष खर्ची पाडले तो विचार पुढे नेउन स्मृती दिनानिमित्त समाजात चांगला एक संदेश जावा या उदात्त हेतुने 2 कामगार व् 1 कामगार पुत्राचा सत्कार करून सन्मानीत करण्यात आले, गेल्या महिन्यात साक्री पुणे बसवर चालक दिनेश गोकुळ पाटील तर वाहक राहुल बैसाने हे आपली सेवा बजावत असतांना बस पुणे येथे पोहचली व् परतीच्या प्रवासास सुरवात करतांना त्यांना बसमध्ये एक बॅग नजरेस पडली त्या ब्यागेत 30 हजाराची रोकड़, 3 तोळे सोने, 20 हजार किमतीचा एंड्रॉइड मोबाइल सापडला सुमारे दीड लाखांचा ऐवज होता सोबत कागदपत्रे होती त्यांनी मोबाईल च्या सहाय्याने नातेवाईक व् मालकाचा शोध लावला व् तो सर्व ऐवज मालक श्रद्धा घरटे राहणार पिंपळणेर ह मु पुणे यांच्याशी संपर्क करुण परत केला, दूसरे सत्कारमूर्ति कृषी खात्यातील सामान्य सेवानिवृत्त कर्मचारी रमेश जयदेव साळुंके रा शेवाळी तालुका साक्री ह मु धुळे यांचा सुपुत्र चि विशाल ह्याला एम एस ( मास्टर ऑफ़ सायन्स) या उच्य शिक्षणासाठी टेक्सास विद्यापीठ अमेरिका येथील फेलोशिप सह निवड झाली ही बाब कामगारांच्या दृष्टीने गुणगौरवाची अभिमानाची व् श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करुण देणारी आहे त्याची दखल घेणे ही चळवळीच्या व् कामगारांच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे म्हणून या त्रिमूर्तिंना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय किसान महासभेचे उपाध्यक्ष तथा साखर कामगारांचे नेते दत्ताजी देशमुखांच्या सोबत काम करणारे कार्यकर्ते कॉ सुभाष दादा काकुस्ते, प्रमुख अतिथी साक्री चे गटशिक्षण अधिकारी बी बी भील, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय भोसले, धनंजय सोनवणे,धुळे पतसंस्थेचे माजी चेअरमन प्रकाश बापू साळुंके, किरण नांद्रे, नथा कुवर, कावठे गांवचे सरपंच दिनेश बोरसे, सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश बोरसे, शरद धनगर, भारत कुवर, सोनलकुमार बोरसे,आदींच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन व् गुणगौरव सोहळा पार पडला एकूणच त्रिमूर्तिनी तमाम कामगार वर्गाची मान उंचावेल असे श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करुण दिली,या दृष्टीने वरील 3 कामगारांच्या कामामुळे कामगार जगताची मानच उंचावेल हयात काही शंका नाही यावेळी सर्व कामगार बंधू भगिनी उपस्थित होते ,सत्कारमूर्तिनी भविष्यात कॉ ए बी बर्धन साहेबांच्या विचारांनी आम्ही प्रेरित झालो हा विचार आयुष्यभर दिशादर्शक राहील अशी मनःपूर्वक मनोगत व्यक्त केली.प्रमुख अतिथी कॉ.सुभाष काकुस्ते, विजयजी भोसले, गटशिक्षण अधिकारी बी बी भील,दिनेश बोरसे कावठे येथील सरपंच, पत्रकार धनंजय सोनवणे यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली,सुत्रसंचालंन विभागीय सचिव किरण नांद्रे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एस यू देवरे, प्रणराज मोहिते, गजानन कट्यारे, रूपाजी पवार , घनशाम सैंदाने, आदिनी सहकार्य केले