पिंपरी :- तातडीच्या दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी (दि.१५) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पिंपरीतील वीज पुरवठा बंद राहणार आहे. यासंदर्भात महावितरणच्या वतीने वीज ग्राहकांना जाहीर सूचना देत कळविण्यात आले आहे.
महावितरण कडून देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पिंपरी शाखा अंतर्गत मधील सर्व वीज ग्राहकांना कळवण्यात येते की, दि.१५.०७.२०२३ रोजी शनिवारी पिंपरी कॅम्प भागातील पिंपरी कॅम्प 22KV उपकेंद्र येथे अत्यंत तातडीचे दुरुस्तीचे कामे करायची आहेत. त्यामध्ये ब्रेकर पोल बदलणे, ब्रेकर सर्व्हिसिंग करणे, अपघात प्रवरण ठिकाणचे 22KV उपरीवाहिनीची दुरुस्ती करणे करीता खालील ठिकाणचा वीज पुरवठा सकाळी ठिक ९.०० वाजेपासून ते दुपारी ५.०० वाजेपर्यत बंद राहणार आहे.
पिंपरीगाव, वाघेरे आळी, माळी आळी, कुदळे कॉलनी, B-ब्लॉक, C-ब्लॉक, पिंपरी कॅम्प, पिंपरी मार्केट, भाटनगर, मिलिंदनगर, इत्यादी ठिकाणचा वीजपुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. तरी सर्व वीज ग्राहकांनी याची कृपया नोंद घ्यावी व महावितरण कंपनीस सहकार्य करावे असे म्हटले आहे.