पिंपरी : साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेजला उत्कृष्ठ शिक्षण प्रणाली राबविल्याबाबत दैनिक लोकमततर्फे “लोकमत एज्युकेशन” पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री. भागवत कराड यांच्या हस्ते पुणे येथे शनिवार रोजी प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रशांत भीमराव पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराने धुळे जिल्ह्यातील साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
साक्री (जि. धुळे) सारख्या आदीवासी पाडयातील गोरगरीब मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या उददेशाने प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज सूरू करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शाळेमार्फत सुक्ष्म नियोजन केले जाते. त्यानुसार, तज्ञ शिक्षकांकडून त्याची अंमलबजावणी करण्यात येते. विद्यार्थी आणि शाळेच्या गुणवत्तेचा आलेख उच्चावत राहिला आहे. यामुळेच प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजला सलग तीन वर्षे उत्कृष्ठ शाळा म्हणून गौरविण्यात आले आहे. यामध्ये, 2020-21 साली उच्चतंत्र शिक्षणमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सन्मान झाला. तसेच, 22-23 ला शालेय शिक्षणमंत्री श्रीम. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते उत्कृष्ठ शाळा म्हणुन पुरस्कार बहाल करण्यात आला. सलग तिस-या वर्षी म्हणजेच 2023-24 मध्येही महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. श्री. दिपकजी केसरकर यांच्या शुभहस्ते उत्कृष्ठ शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले.
यासह, शाळेतील सहा शिक्षकांना “आदर्श शिक्षक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नुकतेच पुणे येथे प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष म्हणून माझा “कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा”ने सन्मान करण्यात आला आहे. चाळीसगाव विधानसभा आमदार मंगेश चव्हाण आणि देशात कमी कालावधीत नाव कमविणा-या “झुमकावाली पोर” या गाण्याचे फेम कलाकार यांच्या शुभहस्ते हा गौरव करण्यात आला.
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १० वी आणि १२ वी च्या परिक्षेत सलग पाच वर्षे १०० % निकालाची परंपरा कायम राखली आहे. तसेच, 10 वी वर्गातील 15 विद्यार्थी तालुक्यात पहिल्या क्रमांकाचे गुणवंत विद्यार्थी ठरले आहेत. कोणत्याही खाजगी क्लासेसमध्ये प्रवेश न घेता प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाने साक्री तालुक्यामध्ये गगन भरारी घेतली आहे.
विषय कौशल्यासह मैदानी खेळातही विद्यार्थ्यांचा कसून सराव करून घेतला जातो. राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हा, तालुका, शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये मोठया संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग करून घेण्यात येतो. तसेच, विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यास प्रोत्साहित करण्यात येते. शाळेच्या नियोजनबध्द वेळापत्रकानुसार कामकाज सूरू असल्याने कुठलीही समस्या भेडसावत नाहीत. गणपती, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी तसेच सांस्कृतिक महोत्सव मोठया उत्साहात साजरे करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह कायम राहतो. हसत खेळत शिक्षण ही पध्दत प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये राबविण्यात येत असल्याची माहिती प्रचिती इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी दिली.