पिंपरी:- भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर कमिटीच्या वतीने आज (दि.१ ऑगस्ट २०२३) रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच अंकुश चौक येथुन ते निगडी अण्णा भाऊ साठे पुतळ्या पर्यंत हलगी वाजवून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मण साळुंके, पुणे जिल्हा सचिव सुनिल ससाणे, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गौतम गायकवाड, विशाल केंगार, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष परमेश्वर निसरगंध, पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख एकनाथ कसबे, अंकुश चौक शाखा अध्यक्ष विकास बनपट्टे, हलगी मास्तर वसंत साळुंके, नारायण मांजरे, दशरथ सुर्यवंशी, रमेश रोकडे, रवी येडे, भागवत आहिरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.