चौफेर : सातारा जिल्ह्यातील फलटण (साखरवाडी)ची लेक असणारी देविका शिंदे- गरुड हिने आपल्या कर्तृत्वाने अमेरिकेत गुगल कंपनीमध्ये स्थान मिळवले ही गोष्ट नक्कीच सातरकरांसाठी अभिमानाची आहे. देविका हिचे माहेर साखरवाडी (माजी सरपंच महादेव बळीबा भोसले यांची नात) तर सासर कराड तालुक्यातील येणके (प्राचार्य एम.एन.गरुड- आजीव सेवक स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांची सून) हे आहे.
साखरवाडी विद्यालय येथे तिचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आहे. १० वी व १२ वी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर देविकाने कराड मधील गव्हर्नमेंट फार्मसी कॉलेज मधून बी फार्मसी पूर्ण केली. त्यानंतर देविकाच्या शैक्षणिक यशाचा प्रवास एम. बी. ए., डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, बिझनेस मॅनेजमेंट मध्ये पीएचडी असा निरंतर चालू राहिलेला दिसून येतो.
शैक्षणिक प्रवासा इतकी देविकाची कारकीर्द उज्वल आहे. देविकाने आपली कारकीर्द असिस्टंट प्रोफेसर म्हणून सिंहगड कॉलेज येथे सुरू केली. त्यानंतर ती शैक्षणिक संस्था मध्ये डायरेक्टर होती. अमेरिकेतील जॅक्सन स्टेट कम्युनिटी कॉलेजमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आणि आता अमेरिके मधील गुगल कंपनीमध्ये कन्टेन्ट मॉडरेटर म्हणून स्थान पटकावले आहे. ही बाब नक्कीच सर्वांसाठी अभिमानाची आहे. तिला यासर्व प्रवासामध्ये पती श्री.हर्षल गरुड यांची मोलाची साथ व प्रोत्साहन मिळाले. देविका अशीच ज्ञानवंत, गुणवंत, यशवंत, किर्तीवंत होवो. या सदिच्छा!!